यूफोरबियाच्या एका प्रजातीचा राजापूर तालुक्यात आढळ

रत्नागिरी : राजापूर तालुक्याच्या कातळ परिसरात यूफोरबिया वनस्पतीच्या एका प्रजातीचा आढळ झाला आहे. भारतीय वनस्पती सर्वेक्षणातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्वर्गीय डॉ. पी. लक्ष्मीनरसिंहन यांच्या नावाने ही प्रजाती ओळखली जाणार आहे.

Continue reading

‘कोकणातील कातळसडे, खाजणे आणि देवरायांत फुलपाखरांचा सर्वाधिक आढळ’

आंबोली, पारपोली, मार्लेश्वर, तिल्लारी, गगनबावडा, आंबाघाट, चांदोली परिसर, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी किनाऱ्यावरील खाजण वने आदींसह कातळसडे आणि देवराया हा वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरांचा अधिवास असल्याचे प्रतिपादन देवरूख (संगमेश्वर) येथे, आपल्या परसदारी फुलपाखरू उद्यान ही संकल्पना यशस्वी करणारे वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे केले. वन विभाग रत्नागिरी (चिपळूण) आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांची जैवविविधता, संवर्धन आणि उद्यान निर्मिती’ या विषयावरील वेबिनार व्याख्यानात मोरे बोलत होते.

Continue reading

रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांविषयी सोमवारी वेबिनार

चिपळूण : येथील वन विभाग रत्नागिरी (चिपळूण) आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांविषयी उद्या (दि. ५ जुलै) देवरूख येथे वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.

Continue reading