रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांविषयी सोमवारी वेबिनार

चिपळूण : येथील वन विभाग रत्नागिरी (चिपळूण) आणि मानद वन्यजीव रक्षक नीलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांविषयी उद्या (दि. ५ जुलै) देवरूख येथे वेबिनार आयोजित करण्यात आला आहे.

परसदारी फुलपाखरू उद्यान ही संकल्पना यशस्वी करणारे वन्यजीव अभ्यासक प्रतीक मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. उद्या सायंकाळी ५ वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांची जैवविविधता, संवर्धन आणि उद्यान निर्मिती या विषयावर त्यांचे व्याख्यान होईल.

श्री. मोरे यांनी महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेच्या सहकार्याने साद निसर्गाची अंतर्गत याच विषयावर विशेषांक लेखन केले असून ते गेली ७ वर्षे यावर अभ्यास करत आहेत. मानव-प्राणी संघर्ष, देवराई संवर्धन, हॉर्नबिल, कोकणातील सड्यांची जैवविविधता यावर संशोधन सुरू असलेले मोरे उद्याच्या वेबिनारमधून फुलपाखरांचे विश्व उलगडून सांगणार आहेत.

या वेबिनारमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व पर्यावरण आणि फुलपाखरूप्रेमी जिज्ञासूंनी व्हिडीओ कॉल लिंक https://meet.google.com/ccm-nfmg-gfs याद्वारे कार्यक्रमाचा आवर्जून लाभ सोमवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे विभागीय वनाधिकारी दीपक खाडे आणि रत्नागिरी जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply