अच्युत फडके यांचे निधन

रत्नागिरी : कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील शिक्षण सुधारक समितीचे कार्यवाह आणि रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अच्युत शंकर फडके (वय ८४) यांचे अल्प आजाराने शनिवारी (दि. ३ जुलै) निधन झाले. सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते, परंतु त्यांचे तेथे निधन झाले.

मूळचे कुर्धे गावातील अच्युतकाका सुरवातीच्या काळात वाडा (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील विद्यालयात कनिष्ठ लिपीक होते. त्यानंतर ३५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलमध्ये वरिष्ठ लिपीक म्हणून सेवा बजावली. कार्यतत्पर, प्रामाणिक, अचूक हिशोब आणि निःस्वार्थी वृत्तीने काम करण्यासाठी सुपरिचित होते. कुर्धे येथील शिक्षण सुधारक समितीचे सल्लागार म्हणून सेवा दिली. त्यानंतर गेली २५ वर्षे कार्यवाह या पदावर काम करताना संस्थेचा नावलौकिक वाढवला. समितीतर्फे कुर्धे येथे रा. पु. पटवर्धन विद्यामंदिर सुरू करण्यात आणि संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. निधी संकलन, शाळेची इमारत उभी करण्यापासून विविध सोयीसुविधा देण्यासाठी त्यांचे योगदान लाभले. अखेरपर्यंत ते कार्यरत राहिले. रत्नागिरीतील वेदशाळा संस्थेच्या कार्यकारी मंडळातही ते कार्यरत होते.

अच्युतकाकांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply