रत्नागिरी जिल्ह्यात नवे करोनाबाधित पु्न्हा ५०० च्या वर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (३ जुलै) ५१५ नवे करोनाबाधित आढळले, तर ४५३ रुग्ण करोनामुक्त झाले. कालच्या एका दिवसाचा अपवाद वगळता आजही पुन्हा जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५०० च्या वर गेली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – २०६, अँटिजेन चाचणी – १९७ (एकूण ४०३). आधी नोंद न झालेल्या ११२ रुग्णांची नोंद आज झाली. त्यांच्यासह जिल्ह्यातील आजचे एकूण रुग्ण ५१५ आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ६३ हजार ५५२ झाली आहे. जिल्ह्याचा आजचा रुग्णवाढीचा दर ७.३२ झाला आहे. एकूण रुग्णवाढीचा दर १४.०६ टक्के आहे.

आज पाच हजार ५३५ सक्रिय रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात दोन हजार ६२४ गृह विलगीकरणात, दोन हजार ९११ संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आणखी ६२४ जणांची कोविन पोर्टलवर नोंद होणे बाकी आहे.
आज सात हजार २२५ जणांची चाचणी निगेटिव्ह आली. आतापर्यंत जिल्ह्यातील तीन लाख ९५ हजार ८५५ जणांची करोनाविषयक चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्ह्यात आज ४५३ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ५५ हजार ५८३ झाली आहे. करोनामुक्तांची आजची टक्केवारी ८७.४६ टक्के आहे.

जिल्ह्यात आज ५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंदविलेल्या गेलेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या एक हजार ८१० झाली आहे. मृत्युदर २.८५ टक्के झाला आहे.
जिल्ह्यातील आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ५९२, खेड १७०, गुहागर १३८, दापोली १५१, चिपळूण ३५४, संगमेश्वर १६५, लांजा ९४, राजापूर १०७, मंडणगड २५. इतर जिल्ह्यातील १३. (एकूण १८१०).
……..

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply