सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी नव्या करोनाबाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. आज ती दुपटीहून अधिक आहे.
आज, ३ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंतच्या २४ तासांत ७२२ आणि एकूण ३६ हजार ७८४ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. आज नवे ३४१ करोनाबाधित रुग्ण आढळले.
सध्या जिल्ह्यात ४ हजार ७८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ३४१ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी ही माहिती दिली.
आजच्या नव्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – देवगड – ८७, दोडामार्ग – १०, कणकवली – ४३, कुडाळ – ६७, मालवण – ५६, सावंतवाडी – ३७, वैभववाडी – ८, वेंगुर्ले – ३३. एकूण करोनाबाधितांची संख्या ४२ हजार ६३६ झाली आहे.
जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची तालुकानिहाय संख्या अशी – देवगड ६३५, दोडामार्ग १६८, कणकवली ८४१, कुडाळ ९८१, मालवण ८९६, सावंतवाडी ५३६, वैभववाडी १९६, वेंगुर्ले ५१०, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १७. सक्रिय रुग्णांपैकी २४७ रुग्ण ऑक्सिजनवर तर ४७ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.
आज जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १०७० झाली आहे. आज नोंद झालेल्या पाच आणि आधी मरण पावलेल्या आणि आज नोंद झालेल्या दोन मृतांचा तपशील असा – देवगड १, कणकवली १, कुडाळ ३, मालवण २.
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची तालुकानिहाय एकूण संख्या अशी – देवगड – १४०, दोडामार्ग – ३१, कणकवली – २१४, कुडाळ – १६४, मालवण – २१७, सावंतवाडी – १५०, वैभववाडी – ६७, वेंगुर्ले – ८१, जिल्ह्याबाहेरील रुग्ण – ६.
Follow Kokan Media on Social Media

