उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, की ‘लोकांच्या आरोग्याला घातक असलेलं कोणतंही काम सरकार करणार नाही. प्रदूषणकारी प्रकल्पांना कोकणात आळा घातला जाईल.’
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं, की ‘लोकांच्या आरोग्याला घातक असलेलं कोणतंही काम सरकार करणार नाही. प्रदूषणकारी प्रकल्पांना कोकणात आळा घातला जाईल.’
तीन फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत चिपळूणमधील श्री. फडके गुरुजी पुरोहित मंडळाने ऋग्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन केले आहे. दिवंगत वेदमूर्ती दिनकरशास्त्री जनार्दन फडके यांच्या स्मरणार्थ त्यांच्या विद्यार्थ्यांनी हा स्वाहाकाराचा कार्यक्रम ठरवला आहे.
वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके यांचे १७ मे २०२५ रोजी निधन झाले. त्यांना चिपळूणकरांनी शोकसभेत श्रद्धांजली अर्पण केली.
दिवंगत फडकेशास्त्रींना श्रद्धांजली वाहण्यासाठी शनिवारी, सात जून २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता चिपळूणमध्ये श्रद्धांजली सभा होणार आहे. वेदमूर्ती दिनकरशास्त्री फडके विद्यार्थी मंडळ आणि चिपळूणचा ब्राह्मण सहायक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी : वेदमूर्ती दिनकर जनार्दन फडके यांचे काल (१७ मे २०२५) रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रत्नागिरीत निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या (१९ मे) दुपारी तीन वाजल्यानंतर कुर्धे या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.
चिपळूण : येथील दिशान्तर सामाजिक संस्थेने घेतलेल्या पुढाकारातून खांदाट (ता. चिपळूण) येथील वैतरणा नदीवर पाच कोटी लिटर क्षमतेच्या सिमेंट काँक्रीट बंधार्याची निर्मिती करण्यात आली आहे.