खेडशीच्या स्वरूपानंद वसाहत जि. प. शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात

उन्हाळी सुट्टीनंतर आज, १५ जून रोजी राज्यातील शाळा पुन्हा एकदा मुलांच्या किलबिलाटाने भरून गेल्या. रत्नागिरी तालुक्यातील खेडशी गावातील गयाळवाडी येथील स्वामी स्वरूपानंद वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशीच्या प्रवेशाचा जल्लोष

रत्नागिरी : रत्नागिरीसह जिल्ह्यातील बहुतेक सर्वच शाळांमध्ये ढोल-ताशांच्या गजरात आज शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.