तिसरी, चौथी, सहावीचा ‘सेतू’ अभ्यासक्रम – नियोजनाच्या सेतूअभावी पालकांना भुर्दंड!

तिसरी, चौथी आणि सहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाला सामोरे जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची पूर्वतयारी सुकर व्हावी यासाठी आणि जुन्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी, यासाठी सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हा उपक्रम स्तुत्य असला, तरी या सेतू अभ्यासक्रमाची दीडशे पानांहून अधिक मोठी असलेली पुस्तके विद्यार्थ्यांच्या पालकांना स्वतः छापून घ्यावी लागणार आहेत.

… आणि दीड महिन्यानंतर शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट; रत्नागिरीत उत्साहात पार पडला प्रवेशोत्सव

दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज (१५ जून) रत्नागिरीतील शाळा मुलांच्या किलबिलाटाने पुन्हा गजबजल्या. जिल्हा परिषद आणि सरकारी शाळांसह खासगी शाळांमध्येही शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला.

पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जगात कुठेही झाले नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात : डॉ. उदय सामंत

‘पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं जगात कुठेही झालं नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात होत आहे. आपलं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकतंय, याचा पालकांना अभिमान असला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून माझ्यासारख्या अनेकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे,’ असं प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं.

रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरात विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

भारत शिक्षण मंडळाच्या नव्या वास्तूमध्ये कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिराचा प्रवेशोत्सव कार्यक्रम आज (१६ जून) उत्साहात पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात गुलाबपुष्प आणि चाफ्याचे फूल देऊन आणि औक्षण करून मुलांचे स्वागत करण्यात आले. बियाणी बालमंदिर व भिडे आजी खेळघरातही शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला.

मुलांच्या किलबिलाटाने शाळा पुन्हा गजबजल्या; रत्नागिरीत प्रवेशोत्सव उत्साहात

सुमारे दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्टीनंतर आज (१६ जून) नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे शाळा पुन्हा मुलांच्या किलबिलाटाने गजबजल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात १० हजार १२१ विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे.

रत्नागिरीतील कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात शाळा प्रवेशोत्सव

शाळेच्या पहिल्या दिवशी (१५ जून) कृष्णाजी चिंतामण आगाशे विद्यामंदिरात पाठ्यपुस्तके व गुलाबपुष्प देऊन, ढोल-ताशांच्या गजरात नवागतांचे अनोखे स्वागत करण्यात आले.