पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जगात कुठेही झाले नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात : डॉ. उदय सामंत

‘पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं जगात कुठेही झालं नसेल, असं स्वागत महाराष्ट्रात होत आहे. आपलं मूल जिल्हा परिषद शाळेत शिकतंय, याचा पालकांना अभिमान असला पाहिजे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून माझ्यासारख्या अनेकांनी जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रगती केली आहे,’ असं प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री आणि मराठी भाषामंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं.

कापडगाव, झरेवाडी, पावस, टिके, टेंभ्ये या टीबीमुक्त ग्रामपंचायतींचा सत्कार

क्षयरोगमुक्त ग्रामपंचायती म्हणून निवड झालेल्यापैकी कापडगाव, झरेवाडी, पावस, टिके, टेंभ्ये या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह/पदक देऊन आज प्रातिनिधिक स्वरूपात गौरवण्यात आले.