रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना समारंभपूर्वक निरोप

रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे आज (२० सप्टेंबर) निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर; रत्नागिरीत अडकलेल्या तामिळी तरुणांची रत्नागिरी पोलिसांकडून भोजनव्यवस्था

रत्नागिरी : रत्नागिरीच्या एमआयडीसीत अडकून पडलेल्या दोनशे तामिळी तरुणांची भोजनाची व्यवस्था रत्नागिरीचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केली. तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, तर त्यांच्याकडून जिल्हा पोलीस प्रमुखांना आलेल्या ट्विटर संदेशाची त्वरित दखल घेऊन मुंढे यांनी ही व्यवस्था केली.

रत्नागिरीकरांनो, ३१ मार्च आणि एक एप्रिलला रक्तदान करणार ना!

रत्नागिरी : करोना विषाणूसंसर्गाचे संकट ओढवलेले असल्यामुळे रक्तदान शिबिरे घेण्यावरही मर्यादा आली आहे. त्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, सुरक्षिततेचे सगळे निकष पाळून रत्नागिरीत ३१ मार्च आणि एक एप्रिल २०२० रोजी रक्तदान शिबिरे होणार आहेत. ३१ मार्चचे शिबिर ‘रत्नागिरी आर्मी’ने आयोजित केले आहे. तसेच, एक एप्रिलचे शिबिर अनुलोमतर्फे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये सहभागी होऊन रक्त संकलनाला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.