रत्नागिरीकरांनो, ३१ मार्च आणि एक एप्रिलला रक्तदान करणार ना!

रत्नागिरी : करोना विषाणूसंसर्गाचे संकट ओढवलेले असल्यामुळे रक्तदान शिबिरे घेण्यावरही मर्यादा आली आहे. त्यामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, सुरक्षिततेचे सगळे निकष पाळून रत्नागिरीत ३१ मार्च आणि एक एप्रिल २०२० रोजी रक्तदान शिबिरे होणार आहेत. ३१ मार्चचे शिबिर ‘रत्नागिरी आर्मी’ने आयोजित केले आहे. तसेच, एक एप्रिलचे शिबिर अनुलोमतर्फे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांमध्ये सहभागी होऊन रक्त संकलनाला हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली रत्नागिरी आर्मी सुदृढ समाजासाठी काम करते. सद्यस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची निर्माण होणारी गरज लक्षात घेऊन या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. करोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांचे काटेकोर पालन या वेळी केले जाणार आहे.

३१ मार्च २०२० रोजी सकाळी १० ते दोन या वेळेत मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हे रक्तदान शिबिर होणार आहे. जे नियमितपणे रक्तदान करतात आणि ज्यांना रक्तदान करून तीन महिने पूर्ण झाले आहेत, अशा व्यक्तीच या शिबिरात सहभागी होऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले.

इच्छुकांनी आपली नावे ९४२२० ०३१२८ या क्रमांकावर कळवावीत, असे आवाहन रत्नागिरी आर्मीने केले आहे. रक्तदान शिबिरात एका वेळी तीन ते चार जणांनाच आतमध्ये घेतले जाणार आहे. इच्छुकांना रक्तदान करण्यासाठी येण्याची वेळ सांगण्यात येणार आहे. डायबेटीस, लो/हाय ब्लड प्रेशर आदी विकार असल्यास किंवा कोणतेही औषधोपचार सुरू असल्यास अशा व्यक्तींनी या शिबिरात सहभागी होऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

एक एप्रिल २०२० रोजी अनुलोम (अनुगामी लोकराज्य महाभियान) या संस्थेच्या रत्नागिरी शाखेतर्फे रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हेही शिबिर सकाळी १० ते दुपारी दोन या वेळेत होणार आहे. गर्दी होऊ नये म्हणून इच्छुक रक्तदात्यांनी खालील फोन नंबरवर आपली नोंदणी करायची असून, त्यांना येण्याची वेळ कळवली जाणार आहे.

नोंदणीसाठी संपर्क क्रमांक
स्वप्नील सावंत – ७५०७७ ७७५८०
रवींद्र भोवड – ७८२०९ १२९७७
समीर करमरकर – ९४२२४ ३०८०५
अविनाश काळे – ९४२२३ ७२२१२
वल्लभ केनवडेकर – ८८५७९ ५८६५८
सुधीर भोरे – ९०७५१ ०९८७८
धनेश रायकर – ९२७०९ ८८४४३
अमित सामंत – ८२७५४ ५५४६५
सुबहान तांबोळी – ९२२६७ ७३३४४
जितेंद्र शिगवण – ८६००३ ७८१४५
अतुल (बाबा) भुते – ७९७२४ ६५३०३

One comment

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s