रत्नागिरी : आंब्यासारख्या नाशिवंत मालाच्या वाहतुकीची व्यवस्था कोकण रेल्वेमार्फत केली जाणार असून, त्याकरिता संपर्क साधण्याचे आवाहन कोकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. करोनाच्या संकटामुळे देशभरात लॉकडाउन असल्यामुळे शेतीमालाच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हापूस आंब्यासारख्या हंगामी पिकावर कोकणाचे अर्थकारण अवलंबून असते. त्यामुळे या सेवेचा मोठा उपयोग होणार आहे.
कोकण रेल्वे देशभरातील जनतेला आवश्यक असणारी वस्तूंची पूर्तता करण्यासाठी मालवाहतूक चालवत आहे. विशेष गाड्यांची मागणी कायम राहिल्यास कोकण रेल्वेमार्फत भारतीय रेल्वेवरील विविध स्थानकांकरिता विशेष पार्सल गाडी चालविली जाणार आहे. या पार्सल गाडीत औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि आंब्यासारख्या इतर नाशवंत वस्तूंचा समावेश असेल. आंबा बागायतदारांना या सेवेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यांनी वरिष्ठ कमर्शियल मॅनेजरशी (मोबाइल : ९००४४ ७०३९४) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय कोकण रेल्वेच्या पार्सल कार्यालयांशी संपर्क साधून अधिक माहिती घेता येऊ शकेल, असेही कळविण्यात आले आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media