देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार शंकर नाणेरकर यांच्या पाच डझनी आंब्याच्या दोन पेट्या नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी रवाना झाल्या आहेत. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आंब्याची पेटी पहिली पाठविण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.
