करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी केंद्र, तसेच राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करतच आहे. नागरिकांनीही त्यात ऐच्छिक आर्थिक मदतीद्वारे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर्स फंड (प्राइम मिनिस्टर्स सिटिझन असिस्टन्स अँड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स फंड) हा स्वतंत्र निधी सुरू केला आहे. करोनासह भविष्यातील कोणत्याही अशा आपत्तीसाठी या निधीचा उपयोग केला जाणार आहे. पंतप्रधान हे या ट्रस्टचे अध्यक्ष असतील. या निधीत नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अनेक अभिनेते, सेलेब्रिटी, खेळाडू, सामाजिक संस्था, कॉर्पोरेट कंपन्यांनी मदत केली असून, आणखीही अनेक जण पुढे येत आहेत.
महाराष्ट्रातही अनेक व्यक्ती, संस्था, कंपन्या, उद्योजकांनी राज्य सरकारला मदत केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधीचे कोविड-१९ या नावाने स्वतंत्र खाते उघडण्यात आले आहे. यात सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
दोन्ही खात्यांचे तपशील देत आहोत. येथे केलेली मदत करसवलतीस पात्र आहे.
Name of the Account : PM CARES
Account Number : 2121PM20202
IFSC Code : SBIN0000691
SWIFT Code : SBININBB104
Name of Bank & Branch : State Bank of India, New Delhi Main Branch
UPI ID : pmcares@sbi


Chief Minister’s Relief Fund-COVID 19
Savings Bank Account number 39239591720
State Bank of India, Mumbai Main Branch,
Fort Mumbai 400023
Branch Code 00300
IFSC CODE- SBIN0000300