साप्ताहिक कोकण मीडिया – २७ मार्चचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे २७ मार्च २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया पुढील लिंकवर क्लिक करा. https://play.google.com/store/books/details?id=jVPZDwAAQBAJ

अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/9m4o26 येथे क्लिक करा.
किंवा या मजकुराच्या खाली दिलेली फाइलही डाउनलोड करून घेता येईल.

या अंकात काय वाचाल?

मुखपृष्ठकथा – होय आम्ही बेशिस्त आहोत!
संचारबंदी जाहीर केल्यानंतरही नागरिकांनी घडवलेल्या बेशिस्त वर्तनाच्या दर्शनाबद्दल राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी लिहिलेला लेख..

अग्रलेख – लष्करी कारवाईची वेळ येऊ देऊ नका
(वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

करोना : निसर्गाने मानवजातीवर उगारलेले अस्त्र
पालघर येथील सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. भूषण भोईर यांनी लिहिलेला अभ्यासपूर्ण लेख

करोनाच्या पार्श्वभूमीवर हापूस आंबा उद्योगाची दशा आणि दिशा
कोकणभूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांनी लिहिलेला लेख

करोना प्रतिबंधासाठी प्रशासकीय समन्वय आवश्यक
रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख

साखरपा (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील दुर्लक्षित गडदू (शिलालेख)
अमित पंडित यांचा लेख

याशिवाय, रत्नागिरीतील धन्वंतरी रुग्णालयाच्या यशोगाथा, कविता, इत्यादी…

संपादक : प्रमोद कोनकर

अंकासाठी आणि वार्षिक वर्गणीसाठी संपर्क : 9422382621

(अंकाची किंमत १० रुपये. वार्षिक वर्गणी फक्त ६०० रुपये. )

कोकण मीडिया व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक : https://bit.ly/36RKgWt

Leave a Reply