रो-रो सेवा कोकणवासीयांसाठी नव्हेच

मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात येणार असलेली कोकण रेल्वेची रो-रो सेवा कोकणवासीयांसाठी अत्यंत अव्यवहार्य ठरणार आहे. कोकणातील अनेक प्रवाशांच्या दृष्टीने सध्या चालवण्यात येणाऱ्या प्रवासी गाड्या कोकणवासीयांपेक्षा दक्षिणेकडे जाणाऱ्या राज्यातील प्रवाशांसाठी सोडल्या जातात, असा आरोप केला जातो. कारण जलद आणि अतिजलद गाड्यांचे खूपच कमी थांबे कोकणातील स्थानकांवर आहेत. त्याच पद्धतीने मोटारींची वाहतूक करणारी ही रो-रो सेवासुद्धा कोकणवासीयांसाठी कोणत्याही दृष्टीने व्यवहार्य ठरण्याची शक्यता नाही.

सुवर्णपदक मिळाले; संधीचे सोने करणार?

सुमारे तीस वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेशी आंब्याची लागवड निगडित केल्यानंतर आंब्याचे उत्पादन भरभराटीला आले; पण त्यानंतरच्या सुमारे पंधरा वर्षांमध्ये आंब्याच्या उत्पादनाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एकेकाळचा आंब्याच्या लागवडीचा बहर काहीसा ओहोटीला लागला आहे. दीड-दोन महिन्यांच्या आंब्याच्या हंगामात मिळणाऱ्या पिकावर वर्षभर प्रक्रिया होऊ शकेल, अशी कोणतीही योजना नाही. अशा अनेक प्रश्नांवर बारकाईने विचार केला गेला नाही तर आंब्यासाठी मिळालेले सुवर्णपदक जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील काचपेटीत ठेवण्याएवढेच महत्त्वाचे राहील. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा फारसा उपयोग होणार नाही.

राजकारणासाठी मराठी भाषा

मराठीबाबत गळा काढताना अमराठी भाषिक रोजगार आणि व्यवसायाचे निमित्ताने गावागावांपर्यंत पोहोचले आहेत, याकडे या दोन्ही पक्षांचे लक्ष नाही. खारी-बटर विकणाऱ्यांपासून किराणा दुकानांपर्यंत आणि छोट्या-मोठ्या दुरुस्त्यांपासून मोठ्या कारखान्यांपर्यंत अमराठी भाषिक सर्वत्र पोहोचले आहेत. कोकणातही राजस्थानी, मारवाडी, केरळ-कर्नाटकातील अनेक व्यावसायिक स्थिरस्थावर झाले आहेत. ते आपली भाषा सांभाळून मराठी प्रांतात व्यवसाय करून आपला उत्कर्ष साधत आहेत. पण ते जी कामे करतात ती करायला मराठी माणसांना प्रवृत्त करण्यासारखे उपयुक्त काम मराठीचा आग्रह धरणारे शिवसेना आणि मनसेसारखे पक्ष करत नाहीत. त्यात त्यांना स्वारस्यही नाही.

फेरबदलासह राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर; अजित पवार अर्थमंत्री, तर वळसे-पाटील सहकारमंत्री

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (१४ जुलै २०२३) खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.

रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महाराष्ट्र दिन ध्वजवंदन

रत्नागिरी : रत्नागिरीत जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या हस्ते आज येथील पोलीस संचलन मैदानावर चौसष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजवंदन झाले.

बंडखोर की तारणहार?

शिवसेनेतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी आपली घुसमट व्यक्त केली. पण मुख्यमंत्री असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यांनी पक्षानिष्ठेपेक्षाही पदच प्रतिष्ठेचे केले. एक प्रकारे उद्धव ठाकरे यांनीच शिवसेनेच्या तत्त्वांशीच अडीच वर्षांपूर्वी बंडखोरी केली. त्याची निस्तरणीच शिंदे आता करत आहेत.