कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहोचवू या : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. शासन प्रशासन गतिमान आहे, हा संदेश आपल्या कामातून देऊ या,’ असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (३० जून २०२२) केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव, तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या वेळी बैठकीस उपस्थित होते.

हाती केवळ एक शून्य!

महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कवी विंदा करंदीकर यांची ‘तेच ते आणि तेच ते’ ही कविता नेहमीच आठवते. रोज नवे काही घडत असल्याचे भासत असले तरी त्यात फारसे काही वेगळे नसते. राजकारण्यांच्या खेळामध्ये पाच वर्षांनी एकदाच खेळल्यानंतर फेकून देण्याच्या लायकीची प्यादी म्हणूनच आपला उपयोग झाला आहे, हे आपल्याला समजत असते. खेळ त्यांचा होतो. आपला जीव जातो. ते पाहायला त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा स्थितीत आपण काहीही करू शकत नाही. विंदा करंदीकरांची कविता आपण जगत असतो.

उपचारापुरता महाराष्ट्र दिन

एकंदरीत राज्याचा वर्धापन दिन साजरा करताना महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असलेल्या कोकणासाठी कोणताच निर्धार नाही. जिल्ह्यापुरता एखादा नवा कार्यक्रम पालकमंत्र्यांना देता आला नाही. चेहर्‍यावर उत्साहाचे उसने हसू आणून महाराष्ट्र दिनाचा एक उपचार एकदाचा पार पडला.

निधी कमी पडू दिला जाणार नाही…

करोनाचा कालखंड संपल्यानंतर मास्क लावा, अंतर ठेवा, स्वच्छता ठेवा, या त्रिसूत्रीचा नेतेमंडळींचा जयघोष थांबला आहे. राज्यापुरते बोलायचे झाले, तर अधूनमधून केंद्र सरकारवर टीका, निधी मिळत नसल्याचा आरोप, केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणारी सापत्नभावाची वागणूक असे मुद्दे ठासून सांगितले जातात. पण त्याला जयघोषाचे स्वरूप येत नाही. अशा वेळी एक नवाच जयघोष राज्यातल्या मंत्रिमंडळाने शोधून काढला आहे. निधी कमी पडू दिला जाणार नाही, हाच तो जयघोष.

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण (11 मार्च 2022)

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 11 मार्च 2022 रोजी 2022-23 या वर्षासाठीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला. त्यांचे हे अर्थसंकल्पीय भाषण –

चिपी विमानतळामुळे कोकणच्या विकासाचा नवा अध्याय – ज्योतिरादित्य शिंदे

सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाने कोकणच्या विकासाचा एक नवा अध्याय लिहिला जात आहे. तीन दशकांचे स्वप्न आज साकार होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी (वेंगुर्ले, सिंधुदुर्ग) विमानतळाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.