सूडाच्या राजकारणात कोकणाची होरपळ

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २७ ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय

रत्नागिरीसह ७ जिल्ह्यांमधील व्यवहार घाईघाईने सुरू करू नयेत – मुख्यमंत्री

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. त्यामुळे रत्नागिरीसह सात जिल्ह्यांमधील स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता सर्व व्यवहार घाईघाईने खुले करू नयेत, अशी सूचना प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

करोनाचे राज्यातील निर्बंध शिथिल केलेले नाहीत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : करोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत, त्यामध्ये कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केले.

तौते चक्रीवादळग्रस्तांसाठी २५२ कोटींची नुकसानभरपाई

रत्नागिरी : अरबी समुद्रात नुकत्याच झालेल्या तौते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीसाठी कोकणवासीयांना प्राथमिक टप्प्यात २५२ कोटींची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे करोनाबाधितांचे गृह विलगीकरण बंद, टाळेबंदीत वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात यापुढे करोनाबाधितांना गृह विलगीकरणात ठेवण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तसे आदेश दिल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी ब्रेक दे चेनअंतर्गत लागू केलेली टाळेबंदी येत्या १ जूनपर्यंत लागू राहणार आहे.

करोनाबाधितांच्या शोधासाठी आता भिस्त फॅमिली डॉक्टरवर

रत्नागिरी : ग्रामीण भागात पसरत चाललेल्या करोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ग्रामीण भागातील फॅमिली डॉक्टरांची राज्य टास्क फोर्स थेट संपर्क साधणार आहे. देशभरातील अशा तऱ्हेचा हा पहिलाच उपक्रम आहे.