रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना समारंभपूर्वक निरोप

रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. त्यांच्यासाठी रत्नागिरी पोलीस दलातर्फे आज (२० सप्टेंबर) निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, जिल्हा परिषद मुख्याधिकारी इंदुराणी जाखड, प्रांत अधिकारी विकास सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, प्रवीण पाटील व सर्व पोलीस अधिकारी वर्ग उपस्थित होता.

‘रत्नागिरीकरांनी भरभरून प्रेम दिले व हा दिवस कायम स्मरणात राहील,’ अशी भावनिक प्रतिक्रिया डॉ. प्रवीण मुंढे यांनी व्यक्त केली.

त्यांच्या कार्यकाळातील कामगिरीचे लोकांकडून कौतुक झाले. त्यांच्या उपक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. ‘वेळ पडली तर डॉक्टर म्हणूनही कर्तव्य बजावून करोनाशी लढा देईन,’ असे उद्गार त्यांनी काढले होते. त्यानंतर रत्नागिरीकरांकडून त्यांचे विशेष कौतुक झाले होते.

डॉ. मुंढे यांच्या जागी सध्या गडचिरोलीत असलेले डॉ. मोहितकुमार गर्ग यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. गर्ग हे जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी इंदुराणी जाखड यांचे पती आहेत.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply