रत्नागिरीतील पर्यावरण संस्थेच्या निबंध स्पर्धेत स्वरा, वर्धन, पूर्वा विजयी

रत्नागिरी : येथील पर्यावरण संस्था आयोजित निबंध स्पर्धेत महाविद्यालय गटातून स्वरा अरुण मुळ्ये प्रथम, माध्यमिक शाळा गटात वर्धन प्रकाश ओळकर आणि चित्रकला स्पर्धेत माध्यमिक गटातून पूर्वा अशोक कोलगे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कामाचा अहवाल सादर करणे आवश्यक – नाना पाटेकर

रत्नागिरी : सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा अहवाल जनतेला सादर करणे आवश्यकच आहे, असे मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी आज येथे व्यक्त केले.

विद्यार्थ्यांनी घेतले कलम बांधणीचे धडे

रत्नागिरी : येथील पटवर्धन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रात कलम बांधणीचे धडे घेतले.

कोकणात नारळाच्या पिकाकडे दुर्लक्ष – डॉ. श्रीरंग कद्रेकर

रत्नागिरी : कोकणात चांगले उत्पन्न देणाऱ्या नारळाच्या लागवडीकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी व्यक्त केली.

माडावर चढण्यात संजय आंबेकर, प्रियांका नागवेकर प्रथम

रत्नागिरी : हातिस (ता. रत्नागिरी) गावात भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी लावलेल्या कल्पवृक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माडावर चढण्याच्या स्पर्धा झाल्या. शिडीच्या साह्याने नारळ झाडावर चढणारा पुरुष आणि स्त्री गट तसेच झाप विणणे या स्पर्धांचे आयोजन हातिसमध्ये करण्यात आले.

नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेत आदिती नागवेकर प्रथम

रत्नागिरी : हातिस ग्रामविकास मंडळ (हातिस आणि मुंबई) आणि भारत अॅग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने हातिस येथील कल्पवृक्षाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.