माडावर चढण्यात संजय आंबेकर, प्रियांका नागवेकर प्रथम

रत्नागिरी : हातिस (ता. रत्नागिरी) गावात भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी लावलेल्या कल्पवृक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माडावर चढण्याच्या स्पर्धा झाल्या. शिडीच्या साह्याने नारळ झाडावर चढणारा पुरुष आणि स्त्री गट तसेच झाप विणणे या स्पर्धांचे आयोजन हातिसमध्ये करण्यात आले.

रश्मी पुसाळकर

हातिस ग्राम विकास मंडळ (हातिस आणि मुंबई) आणि स्वराज्य ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक पद्धतीने आणि शिडीच्या साह्याने माडावर चढण्याच्या स्पर्धेत दोन्ही गटांमध्ये संजय शंकर आंबेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पारंपरिक पद्धतीच्या गटामधून दीपक ज्ञानेश्वर आंबुलकर (हातिस) यांना दुसरा क्रमांक मिळाला. शिडीच्या साह्याने माडावर चढण्याच्या पुरुष गटात संजय शंकर आंबेकर प्रथम, तर उत्तम प्रकाश कालकर यांनी दुसरा आणि नीलेश हिरोजी पुसाळकर यांनी तिसरा क्रमांक पटकावला. शिडीच्या साह्याने माडावर चढण्याच्या स्त्री गटात फक्त सौ. प्रियांका समीर नागवेकर यांनी यशस्वीपणे शिडीच्या झाडावर चढून प्रथम क्रमांक मिळविला. पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमं एक हजार रुपये, ७५० आणि ५०१ रुपयांचे बक्षीस आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. परीक्षक म्हणून संशोधन अधिकारी डॉ. सुनील घवाळी, स्वराज्य ग्रुपचे तुषार आग्रे आणि चंद्रकांत राऊत तसेच श्री. कांबळी यांनी काम पाहिले.

संजय आंबेकर

स्पर्धेसाठी हातिस ग्राम विकास मंडळाचे सदस्य तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सोमेश्वर सरपंच नाझिया मुकादम, माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र झापडेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

झाप विणण्याची स्पर्धा

पीर बाबरशेख मंदिराच्या परिसरात नारळाचे झाप विणण्याची स्पर्धा झाली. त्यामध्ये रश्मी पुसाळकर यांनी ११ मिनिटांत झाप विणून प्रथम क्रमांक पटकविला. दुसरा क्रमांक १२.३० मिनिटांत झाप विणून विठोबा नागवेकर यांनी, तर तृतीय क्रमांक सौ. आरती नागवेकर (१६ मिनिटे) यांनी मिळविला. उत्तेजनार्थ बक्षीस वनिता भास्कर भोवड (१८ मिनिटे) यांना मिळाले. झाप विणणे हे कसब हळूहळू लोप पावत आहे. त्याला पुन्हा ऊर्जितावस्था यावी यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चारही विजेत्यांना अनुक्रमे एक हजार रुपये, ७५०, ५०० आणि २५० रुपये बक्षीस तसेच प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संशोधन अधिकारी डॉ. सुनील घवाळी, स्वराज्य अॅग्रो ग्रुप संस्थापक अध्यक्ष तुषार आग्रे आणि कृषी विभागाचे श्री. कांबळी यांनी काम केले. आयोजनात विशेष सहभाग दीपक आंबुलकर यांचा होता.

झाप विणणे

बक्षीस वितरण कार्यक्रमाला कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, कुमार शेट्ये, महेंद्र झापडेकर, मरिनर दिलीप भाटकर, गनीभाई बंदरी, डॉ. दिलीप नागवेकर, सरपंच सौ. कांचन नागवेकर, भारती पिलणकर, स्वाती फुटक, नाझिया मुकादम, श्रीमती रहाटे, शंतनू नागवेकर, दिवाकर नागवेकर, उत्तम नागवेकर, विजय नागवेकर, जयवंत नागवेकर आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply