रत्नागिरीची आकांक्षा साळवी नृत्यस्पर्धेत देशात प्रथम

रत्नागिरी : रोटरी क्लब चाणक्य, रोटरी डिस्ट्रिक्ट ३२५० आयोजित रोटरी मल्टी डिस्ट्रिक्ट सोलो डान्स कॉम्पिटिशन या देशपातळीवरील स्पर्धेत रत्नागिरीच्या आकांक्षा हिराकांत साळवी हिने देशात प्रथम येण्याचा मान पटकावला. ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमामालिनी, तसेच बिहार येथील प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना सुदीपा घोष यांच्या उपस्थितीत अंतिम स्पर्धा पार पडली. आकांक्षा ही कथ्थक नृत्यगुरू सोनम जाधव यांची शिष्या आहे.

जगभरातील कलाकारांसाठी ऑनलाइन बॉलिवूड डान्स स्पर्धा

रत्नागिरी : अथश्री क्रिएशन्स आणि रास नृत्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन बॉलिवूड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील कलाकारांना त्यात भाग घेता येईल. युवा, खुला, तसेच कपल अशा तीन गटांमध्ये कलाकारांना सहभाग घेता येईल. मुदत २५ जुलै २०२०पर्यंत आहे.

जगभरातील कलाकारांसाठी शास्त्रीय-उपशास्त्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : अथश्री क्रिएशन्स आणि रास नृत्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन शास्त्रीय-उपशास्त्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील कोणत्याही वयोगटाच्या स्पर्धकांना त्यात भाग घेता येईल. सहभागाची मुदत २५ जुलै २०२०पर्यंत आहे.