रत्नागिरी : अथश्री क्रिएशन्स आणि रास नृत्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन बॉलिवूड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील कलाकारांना त्यात भाग घेता येईल. युवा, खुला, तसेच कपल अशा तीन गटांमध्ये कलाकारांना सहभाग घेता येईल. मुदत ३१ जुलै २०२०पर्यंत आहे.
बॉलिवूड डान्स स्पर्धा हिंदी चित्रपटातील गाण्यावर आहे. स्पर्धेचे तीन गट आहेत. ते असे – युवा (डान्स डान्स) – वय १४ ते २४; खुला (झनक झनक) – वय २५ ते पुढे; कपल (आजा नच ले) – वय २५ आणि त्यापुढे.
स्पर्धकाने गाण्यावरील डान्सचा तीन ते पाच मिनिटांचा व्हिडिओ पाठवावा. सादरीकरणापूर्वी स्पर्धकाने नाव व ठिकाणाचा उल्लेख करावा. व्हिडिओ कोणत्याही अॅपमध्ये केलेला, तसेच एडिट केलेलाही चालणार नाही. व्हिडिओ व्हॉट्सअॅप किंवा टेलिग्रामवर 8805602456 या क्रमांकावर किंवा athshreecreations@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. सोबत वयाचा दाखला, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि प्रवेश शुल्क भरल्याची रिसीट जोडावी. स्पर्धेचे प्रवेश शुल्क युवा आणि खुल्या गटासाठी प्रत्येकी १९९ रुपये, तर कपल गटासाठी २९९ रुपये राहील.
स्पर्धेतील सादरीकरण रेकॉर्डेड रचनेवर हवे. प्रत्येक गटात ३-३ बक्षिसे देण्यात येतील. गटातील स्पर्धकांच्या संख्येवर बक्षिसांची संख्या अवलंबून राहील. जगभरातून कोणीही स्पर्धक त्यात सहभागी होऊ शकेल. आलेल्या स्पर्धकांतून प्रत्येक गटातील १० व्हिडिओंची निवड करून त्यांचे मान्यवर परीक्षकांकडून परीक्षण केले जाईल. विजेत्या स्पर्धकांचे व्हिडिओ अथश्री क्रिएशन्सच्या पेजवर अपलोड करण्यात येतील.
शुल्क गुगल पे, फोन पे (9146951069) किंवा अन्य यूपीआय अॅपद्वारे पाठवावे. व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२० आहे.
प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची बक्षिसे अशी – झेब्रॉनिक्स हेडफोन (वायरलेस), सिस्का पॉवर बँक (1000 mah), हॅंगीग लॅम्प (बांबू अँड टेराकोटा). अधिक माहितीसाठी 9767392792 या क्रमांकावर संपर्क साधावा.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड