जगभरातील कलाकारांसाठी शास्त्रीय-उपशास्त्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : अथश्री क्रिएशन्स आणि रास नृत्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाइन शास्त्रीय-उपशास्त्रीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जगभरातील दोन वयोगटातील कलाकारांना त्यात भाग घेता येईल. सहभागाची मुदत २५ जुलै २०२०पर्यंत आहे.

या आगळ्यावेगळ्या स्पर्धेसाठी स्पर्धकांनी व्हिडिओ पाठवायचे आहेत. स्पर्धा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय प्रकारांत होईल. स्पर्धकाने तीन ते पाच मिनिटांचा व्हिडिओ पाठवावा. सादरीकरणापूर्वी स्पर्धकाने नाव आणि ठिकाणाचा उल्लेख करावा. व्हिडिओ कोणत्याही अॅपमध्ये केलेला, तसेच संकलित (एडिटेड) नसावा. सादरीकरण रेकॉर्डेड रचनेवर हवे. स्पर्धेसाठी ताल (वय १४ ते २४) आणि लय (वय २५पासून पुढे) असे दोन गट असतील. प्रत्येक गटात तीन बक्षिसे देण्यात येतील. गटातील स्पर्धकांच्या संख्येवर बक्षिसांची संख्या अवलंबून राहील.

जगभरातून कोणीही स्पर्धक यात सहभागी होऊ शकेल. स्पर्धकांमधून प्रत्येक गटातील १० व्हिडिओंची निवड करून त्यांचे मान्यवर परीक्षकांकडून परीक्षण केले जाईल. विजेत्या स्पर्धकांचे व्हिडिओ अथश्री क्रिएशन्सच्या पेजवर अपलोड करण्यात येतील.

व्हिडिओ WhatsApp किंवा Telegram वर 8805602456 या क्रमांकावर किंवा athshreecreations@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत.

व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख २५ जुलै २०२० आहे.

सोबत वयाचा दाखला, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक आणि प्रवेश शुल्काची पावती जोडावी. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक गटासाठी प्रत्येकी १९९ रुपये असून, एका स्पर्धकाने दोन गटात सहभाग घेतल्यास शुल्क ३४९ रुपये राहील. हे शुल्क Google Pay, Phone Pay किंवा अन्य UPI App द्वारे पाठवावे. फोन पे, गुगल पेसाठी क्रमांक असा – 9146951069.

दोन्ही गटांमधील विजेत्यांना गुणानुक्रमे झेब्रॉनिक्स हेडफोन (वायरलेस), सिस्का पॉवर बँक (1000 mah) आणि बांबू ज्वेलरी सेट अशी बक्षिसे दिली जातील. अधिक माहितीसाठी 9767392792 या क्रमांकावर किंवा https://www.facebook.com/athshreecreations/ येथे संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply