रत्नागिरी जिल्ह्यात चोवीस तासांत ६० नवे करोनाबाधित; तिघांचा मृत्यू

रत्नागिरी : आज (१७ जुलै) सायंकाळपर्यंतच्या चोवीस तासांत रत्नागिरी जिल्ह्यात ६० नवे करोनाबाधित सापडले असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या एक हजार १३०, तर बरे झालेल्यांची संख्या ६८२ झाली आहे. कालपासून आज सायंकाळपर्यंत तिघा करोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातल्या मृतांची संख्या ४० वर पोहोचली आहे.

रत्नागिरीत आजपासून ॲन्टिजेन टेस्टला सुरुवात झाली असून, त्यामध्ये एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, १७ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६८२ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालय येथील एक, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल येथील १२ आणि समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथील चार जणांचा समावेश आहे.

आजच्या बाधितांचे विवरण असे – जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी – ११, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – १८, गुहागर – २६, दापोली – ३, घरडा, खेड 1 (यामुळे घरडा केमिकल्समधील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८२ झाली आहे), ॲन्टिजेन टेस्ट – १ रुग्ण.

मिरकरवाडा, रत्नागिरी येथील ६७ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दुसरा मृत्यू झालेला रुग्ण अनावली (संगमेश्वर) येथील असून, त्याचे वय ५८ वर्षे होते. त्याला मधुमेहाचा आजार होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आज चिपळूण येथील ५७ वर्षीय एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबाधित मृत्यूंची संख्या आता ४० झाली आहे. एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४०८ झाली आहे.

जिल्ह्यात सध्या ८० ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात १९, दापोलीत १०, खेड २१, लांजा ६, चिपळूण १७, मंडणगड तालुक्यात ३ आणि राजापूर तालुक्यात ४ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत. सध्या संस्थात्मक विलगीकरणात १०४ जण असून त्यांचा तपशील असा – जिल्हा सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – ६४, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ५, कोव्हिड केअर सेंटर पेढांबे ७, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल – ५, ग्रामीण रुग्णालय, गुहागर-१, केकेव्ही, दापोली – १९.

मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्या व्यक्तींची संख्या आणखी घटली असून, ती ११ हजार ८९४ इतकी आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत आतापर्यंत १३ हजार १७७ नमुने करोनासाठी तपासण्यात आले असून, त्यापैकी १२ हजार ८२० अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील एक हजार १३० अहवाल पॉझिटिव्ह, तर ११ हजार ७२७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आणखी ३५७ नमुन्यांचा अहवाल रत्नागिरीतील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहे. त्यामध्ये घरडा केमिकल्सच्या खासगी लॅबचे आकडे समाविष्ट नाहीत. परराज्यातून आणि अन्य परजिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत एकूण एक लाख ८६ हजार ८०३ व्यक्ती दाखल झाल्या आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत, तसेच इतर जिल्ह्यांत गेलेल्यांची संख्या ९७ हजार १४२ आहे.
….

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply