समाजाच्या नवनिर्मितीसाठी पूरक साहित्यनिर्मिती हवी : अ‍ॅड. सुभाष लांडे

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : साहित्याची निर्मिती करताना केवळ करमणूक करणारे साहित्य अपेक्षित नसून समाजाच्या नवनिर्मितीसाठी पूरक असलेल्या साहित्याची निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अ‍ॅड. सुभाष लांडे यांनी व्यक्त केली.

हिंदू-मुस्लिम धर्मांत द्वेष पसरविण्याचा प्रयत्न सुरूच

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानंतरही भारतात हिंदू-मुस्लिम धर्मांमध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न सुरूच आहे, असा सूर येथील प्रगतिशील साहित्य संमेलनातील परिसंवादात व्यक्त झाला.

सुंदर माझी शाळा कार्यक्रमाने घेतला बालमनाचा अचूक वेध

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : नको मला चॉकलेट,
नको मला भेळ,
माझ्यासोबत कुणीतरी
खेळा थोडा वेळ… या आणि अशा कवितांनी प्रगतिशील साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात बालमनाचा अचूक वेध घेतला.

राजकारण हा आता शो बिझिनेस : भालचंद्र कानगो

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : अलीकडच्या काळात राजकारण हा शो बिझिनेस झाला आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांनी प्रगतिशील साहित्य संमेलनात केले.

समीक्षा हा वाङ्मयातील दुर्लक्षित प्रांत – वंदना भागवत

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : समीक्षा हा वाङ्मयातील दुर्लक्षित प्रांत आहे. म्हणूनच समीक्षकांनी आता आपले हत्यार परजले पाहिजे, अशी हाक वंदना भागवत यांनी दिली.

हिंदूराष्ट्र म्हणजे भारतातील नवफॅसिझम – डॉ. भालचंद्र मुणगेकर

गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरी (रत्नागिरी) : हिंदूराष्ट्र हा भारतातील नवफॅसिझमचा आविष्कार आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी रत्नागिरीत भरलेल्या पहिल्या प्रगतिशील साहित्य संमेलनात व्यक्त केला.