सरकारी नोंदी होतील कदाचित, पण…

शासकीय यंत्रणेमार्फत पुरविले जाणारे टँकर अत्यंत तुटपुंजे असतात. मोठ्या प्रमाणावर खासगी जलस्रोतांमधून खासगी विहिरींचे मालक आणि टँकरचालक लोकांची पाण्याची गरज भागवत असतात. हे पाणी पिण्यायोग्य आहे का, याची कोणतीही नोंद शासकीय दप्तरात होत नाही. किती प्रमाणात खासगी टँकरद्वारे किती नागरिकांना पाणी पुरविले गेले, याची नोंद कधीही मिळत नाही. त्यामुळे एखाद्या तालुक्यात किंवा एखाद्या विभागात पाण्याची टंचाई नाही, असे टँकर न पुरविण्याच्या निकषानुसार जाहीर असले तरी त्या भागात पाण्याची टंचाई नसतेच असे नाही.

पाणीटंचाईची परंपरा

प्रत्येकाने आपल्या पाण्याची गरज भागवली तर नेते म्हणून त्यांची किंमत कमी होईल ही भीती त्यांना वाटते. म्हणूनच पाण्याच्या टंचाईची रत्नागिरी जिल्ह्याची परंपरा कायम राखण्याकडेच लोकप्रतिनिधी आणि शासनाचाही नेहमीच कल राहतो. नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे नेमेचि उन्हाळा येणार आणि पाणीटंचाई कायम राहणार आहे. पावसाचे पाणी साठविले पाहिजे, हे पालुपद मात्र न चुकता, न विसरता आळविले जाणार आहे. यावर्षीचा उन्हाळा तरी त्याला अपवाद कसा ठरेल?

करोना लॉकडाऊनमध्ये ‘या’ कुटुंबाने विहीर खोदून पाणीप्रश्न सोडवला

राजापूर : करोनातील लॉकडाऊनच्या कालावधीचा सदुपयोग करीत राजापूरमधील बंगलवाडीतील जाधव कुटुंबीयांनी श्रमदानातून ५६ फूट खोल विहीर खोदून पाण्याचा प्रश्न मिटविला आहे. करोना आपत्तीकडे संकट म्हणून पाहिले जात असताना जाधव कुटुंबीयांनी त्या संकटाला संधी म्हणून पाहत स्वयंप्रेरणेतून महिनाभर राबून विहीर खोदली. त्यांनी कष्टपूर्वक पाणीटंचाईवर केलेली मात इतरांसाठी प्रेरणादायी म्हणावी लागेल.