मुळात अशी असभ्य भाषा वापरण्याची वेळ का येते, हाच प्रश्न आहे. एकमेकांबद्दल आकस असू शकतो. परस्परांची मते एकमेकांना न पटण्याची स्थितीही अनेक वेळा निर्माण होते. वेगवेगळ्या पक्षांची मते आणि धोरणे वेगळी असल्यामुळे विरोधातल्या पक्षाची आणि नेत्यांची धोरणे एकमेकांना पटण्याची शक्यता नसते, पण अत्यंत सभ्य, सुसंस्कृत भाषेमध्ये हे एकमेकांना सांगितले जाऊ शकते.