मालवणी संस्कृतिसंवर्धनाचा प्रयोग

विविध बोलीभाषा हेही मराठीचे महत्त्वाचे स्रोत आहेत. या भाषा संवर्धित झाल्या, तरच प्रमाण मराठी भाषेचा अभिजात दर्जा टिकवून ठेवायला मदत होणार आहे. या दृष्टीने बोलीभाषांचे संवर्धनही अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी त्या त्या बोलीभाषामधील कार्यकर्ते दीर्घ काळापासून कार्यरत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर या प्रयत्नांना आणखी बळ प्राप्त झाले आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरोडा या साहित्यभूमीमध्ये झालेल्या मालवणी साहित्य संमेलनाकडे पाहायला हवे.

माझी वसुंधरा अभियान

प्रत्येकाने आपापल्या पातळीवर पर्यावरणाच्या रक्षणाचा प्रयत्न करायला हवा. शहरे आणि ग्रामीण भागामध्ये आयोजित करण्यात आलेले माझी वसुंधरा अभियान त्यासाठी उपयुक्त आहे. मात्र त्यातील उपक्रम केवळ अभियानाच्या आणि स्पर्धेच्या वर्षापुरते राबवून काहीही उपयोग नाही. या उपक्रमांचे महत्त्व पटले असेल तर हे उपक्रम दैनंदिन जीवनाचाच एक भाग झाले पाहिजे. तरच अभियान राबविण्यात काही अर्थ आहे.

बेतालपणाचा विक्रम

भारतीय जनता पक्षातून काँग्रेसकडे गेलेले आणि तेथे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेले नाना पटोले आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध झाले होते. त्यांचा बेतालपणा इतका वाढला होता की त्यांना अलीकडे कोणीही गांभीर्याने घेत नव्हते. काँग्रेसच्या वरिष्ठांनी मात्र या बेतालपणाची दखल घेतली आणि प्रदेशाध्यक्षपद हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुपूर्द केले. पद स्वीकारल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी कोकणातून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला प्रारंभ केला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या दौऱ्याच्या काळात त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या. पक्ष कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. त्यामध्येच त्यांनी प्रचंड टीकेची हौस भागवून घेतली आणि आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आपण कोणती पातळी गाठणार आहोत, याचे दर्शनच घडविले.

भाग्य अपुले अपुल्या हाते…

जे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी त्यातल्या त्यात योग्य कोणता, आपला लोकप्रतिनिधी ठरायला लायक उमेदवार कोणता, हे तरी मतदार नक्की ठरवू शकतो. आपणच मतदारांचे भाग्यविधाते आहोत, असे या प्रत्येक उमेदवाराने आतापर्यंत अनेकदा प्रचारातून सांगितले आहे. पण त्यातही खरोखरीच कोण भाग्यविधाता ठरू शकतो, याचा निर्णय मतदारांनाच घ्यावा लागणार आहे. ते त्यांनी ठरवायला हवे. आवर्जून मतदान करणे हाच तूर्त तरी त्यावरचा एकमेव उपाय आहे. तो योजायला हवा.

प्रबोधन आणि मनोरंजन

दर पाच वर्षांनी येणारी निवडणूक विकासाचे अधिकाधिक चांगले टप्पे पार करण्याचे एक साधन असते, पण विकासाच्या या मुद्द्याकडे सारेच प्रमुख उमेदवार दुर्लक्ष करताना दिसतात. त्यांच्या त्यांच्या पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध झालेले असतात, पण तो एक उपचार असतो. विकासाचे मोठे स्वप्न त्या जाहीरनाम्यामध्ये छापले गेलेले असते. मी स्वतः काय करणार आहे, त्या जाहीरनाम्याच्या दृष्टिकोनातून माझी जबाबदारी कोणती आहे, मतदारांनी मी काय देऊ शकतो, राज्याच्या आणि देशाच्या भल्यासाठी मी काय करू शकतो हे सांगण्याकडे उमेदवार सोयीस्कर दुर्लक्ष करत असतात.

जाहीरनामे आणि वचननामे

मतदारांनी हे जाहीरनामे संकलित करून ठेवले पाहिजेत. जो उमेदवार निवडून आला असेल त्याने किंवा त्याच्या पक्षाने दिलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे कामे होत आहेत का, यावर लक्ष ठेवले पाहिजे. मतदार संघटित नसतात. त्याचा फायदा सर्वच नेते घेत असतात. म्हणून विकासाच्या कितीही थापा मारल्या तरी चालतात, अशी त्यांची धारणा असते.