रत्नागिरीत आज अमृतपेठ थेट बाजारपेठेचे उद्घाटन; दर्जेदार स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचा महोत्सव

अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा राज्यभर यशस्वी ठरलेला अमृतपेठ थेट बाजारपेठ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आज (११ एप्रिल) रत्नागिरीत सुरू होत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन धन्वंतरी हॉस्पिटलच्या डॉ. तोरल शिंदे यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे.

जाणीव फाउंडेशनच्या प्रयत्नांनी निवेंडीतील नदी गाळमुक्त

रत्नागिरी : येथील जाणीव फाउंडेशन या सामाजिक संस्थेने डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या प्रयत्नांमुळे निवेंडीच्या भगवती नगरातील नदी गाळमुक्त झाली.

स्नेहज्योती अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची २६ एप्रिल रोजी रत्नागिरीत मैफल

रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव निवासी अंधशाळा असलेल्या स्नेहज्योती निवासी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची ‘तिमिरातुनि तेजाकडे’ ही सांगीतिक मैफल २६ एप्रिल २०२२ रोजी रत्नागिरीत होणार आहे.