पत्रकारांच्या प्रश्नांवर कार्यशाळेचा उतारा

महाराष्ट्र राज्य माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे रत्नागिरीत दोन दिवसांची पत्रकार कार्यशाळा महासंचालक, संचालक या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. दीर्घ कालावधीनंतर पत्रकारांसाठी महासंचालनालयाने आयोजित केलेली कार्यशाळा उत्तमरीत्या पार पडली. दोन दिवसांच्या कार्यशाळेत मांडता येण्यासारखे विषय मांडले गेले. पत्रकारांचे प्रबोधन झाले. नवी माहिती मिळाली. मुंबई, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील पत्रकारांना रत्नागिरी जिल्ह्याची सैर त्या निमित्ताने झाली. रत्नागिरीतील अलीकडच्या काळातील विकासकामे त्यांना आवर्जून दाखविली गेली. उत्कृष्ट पद्धतीने पार पडलेल्या या कार्यशाळेने पत्रकारांच्या बाबतीत मात्र अनेक प्रश्न अनुत्तरितच ठेवले. किंबहुना पत्रकारांच्या प्रश्नांना बगल देण्याकरिता कार्यशाळेचा उतारा देण्यात आला.

कोकणात गटशेती होण्याची गरज : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रत्नागिरीत प्रतिपादन

‘कोकणात भरपूर क्षमता आहे. कोकणातलं शेतीक्षेत्र छोटं आहे. म्हणूनच इथल्या शेतकऱ्यांना गटशेतीकडे वळवलं पाहिजे. त्यातून शेतीमालाचा ब्रँड तयार होतो आणि विपणन सोपं होतं. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. म्हणूनच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम केलं पाहिजे. शेतकरी अन्नदाता आहे. त्याला कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन व्हायला पाहिजे. तरच शेतकरी समृद्ध होईल. इथे उदरनिर्वाह होत नाही म्हणून इथला तरुण बाहेर जातो. त्याला रोजगार इथेच मिळाला पाहिजे, असं नियोजन केलं पाहिजे,’ असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीत केलं.

राज्यकर्त्यांकडून चांगलं काम करून घेण्याची जबाबदारी पत्रकारांची – पालकमंत्री सामंत

रत्नागिरी : कोकण कॅलिफोर्नियापेक्षाही अधिक सरस करू. कोकणाचा विकास सर्वदूर पोहोचविण्यासाठी माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.