नोकरीच्या मागे न धावता शेतीत उतरा : कोकण कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कृषिमंत्र्यांचे आवाहन

दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ४३वा पदवीदान समारंभ आज (१४ मे २०२५) राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडला.

कोकणातील शेतकऱ्यांनी आत्मपरीक्षण करून शेतीत विविधता आणावी आणि ती वाढवावी : डॉ. उदय सामंत

‘रत्नागिरीच्या हापूस आंब्याला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. त्याचप्रमाणे कोकणात काजू उत्पादनातूनही ब्राझीलप्रमाणे क्रांती होऊ शकते. नोकरीच्या तुलनेत शेतीतून दसपट अधिक पैसे मिळू शकतात; मात्र त्यासाठी आत्मपरीक्षण करून शेती वाढवली पाहिजे. शेतीत विविधता आणली पाहिजे. भात, नाचणीबरोबरच फळबागा लागवड क्षेत्र वाढवलं पाहिजे. कृषी प्रदर्शनाचा उपयोग करून घेऊन शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोग करावेत,’ असं आवाहन रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलं.

किती जणांचे स्थलांतर रोखले गेले?

मंडणगडमधील नव्या औद्योगिक वसाहतीची घोषणा करण्यात आली आहे. या वसाहतीमुळे स्थलांतर रोखले जाणार असल्याचा मुद्दा योगेश कदम यांनी मांडला आहे. हा मुद्दा किती हास्यास्पद आहे, हे सांगण्याची गरजच नाही. तसे नसेल तर आजपर्यंत झालेल्या नवनव्या उद्योगांच्या घोषणा, त्यांची अंमलबजावणी, त्याद्वारे उभारले गेलेले नवे उद्योग आणि तेथे रोजगार मिळाल्यामुळे किती प्रमाणात बेरोजगारी कमी झाली याचीही मोजदाद व्हायला हवी. कोकणातून मुंबई-पुण्याकडे होणारे स्थलांतर किती प्रमाणात रोखले गेले, याची टक्केवारीही त्यातून उघड होऊ शकेल.

मंडणगडमध्ये एक हजार एकर क्षेत्रावर होणार एमआयडीसी; आंबेडकर जयंतीदिनी राज्यमंत्री कदम यांची घोषणा

आंबडवे : रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव. आज (१४ एप्रिल) सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने डॉक्टर आंबेडकर यांची जयंती आंबडवे गावी साजरी करण्यात आली.