महामार्ग, पाणी, विमानतळ आणि उद्योगधंदे या प्राधान्यक्रमाने काम करण्याची नारायण राणेंची ग्वाही

‘महामार्ग, पिण्याचं पाणी, रत्नागिरी विमानतळ आणि उद्योगधंदे या प्राधान्यक्रमाने मी काम करणार आहे. खासदार म्हणून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे. लोकांना अपेक्षित असलेलं काम मी करू शकेन, असा मला विश्वास वाटतो. लोकांनी विश्वास ठेवला, तो मी सार्थकी लावीन. जवळपास ३९ वर्षांनी इथे भाजपचा खासदार निवडून आला आहे, याचा आनंद आहे. आता आम्ही त्यात सातत्य ठेवू,’ असं प्रतिपादन विद्यमान केंद्रीय मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केलं.

रत्नागिरी लोकसभेची उमेदवारी नारायण राणे यांना जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

दिशा मिळाली, लक्ष्य कोठे?

शिंदे शिवसेनेचे रत्नागिरी जिल्ह्यातील नेते तर संपूर्ण जिल्हा शिवसेनामय करण्याच्या प्रयत्नाला लागले आहेत. विविध व्यासपीठांवरून त्याचाच उल्लेख केला जात आहे. याचाच अर्थ भाजपाला एकही जागा देण्याची त्यांची मानसिकता नाही. खासदारपद शिवसेनेचेच आहे, असेही ठामपणे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या विजय संकल्प मेळाव्याचा कितपत उपयोग होईल, हा प्रश्न आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपातर्फे निबंध स्पर्धा

रत्नागिरी : देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र भाजपच्या माध्यम विभागातर्फे ‘गेल्या ७५ वर्षांत देशाने काय कमावले? काय करायचे बाकी आहे?’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.