धन्वन्तरी आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, सावंतवाडी

धन्वन्तरी आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे उपलब्ध असलेल्या विविध सुविधांचा तपशील

करोनाचा धडा : प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी मूलभूत गोष्टी अंगीकारू या!

गेले सुमारे आठ-नऊ महिने आपण सतत ‘करोना’ महामारीच्या दडपणाखाली वावरत आहोत. या महामारीची तीव्रता आता कमी होत असली, तरी अद्याप तिचा पूर्ण बीमोड झालेला नाही. ‘आयुर्वेद’ आणि ‘योग’ या आपल्या अस्सल भारतीय चिकित्सा पद्धती सोडल्या, तर अन्य सर्व चिकित्सा पद्धतींच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. त्या दृष्टीने यापुढील काळात भविष्यकाळातील संभाव्य महामारींचा प्रतिकार करण्याच्या दृष्टीने घ्याव्या लागणाऱ्या जबाबदारीबाबत काही सुचविण्याचा हा एक प्रयत्न.

करोना आणि आयुर्वेदीय उपचार संहिता

योग दिवस संपूर्ण जगात लोकप्रिय झाल्यानंतर केंद्र सरकारने २०१६पासून दर वर्षी येणाऱ्या दीपावलीतील धनत्रयोदशी अर्थात धन्वंतरी जयंती हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे यंदा आज (१३ नोव्हेंबर २०२०) हा दिवस साजरा होत आहे. भगवान धन्वंतरी हे आरोग्यशास्त्राचे आराध्य दैवत मानले जाते. आरोग्यसंवर्धन होण्यासाठी म्हणून धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. Ayurveda for COVID19 Pandemic अर्थात ‘करोनासाठी आयुर्वेद’ हे यंदाच्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाचे घोषवाक्य आहे.

रोगप्रतिकारशक्ती वाढवा; आयुष मंत्रालयाने सुचवली आयुर्वेदीय जीवनशैली

करोना विषाणूवर कोणतीही लस नसल्याने, तो होऊ नये म्हणून काळजी घेणे हेच आपल्या हाती आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितलेले आहेत. रोग होऊ नये म्हणून जीवनशैलीच आरोग्यपूर्ण असण्यावर आयुर्वेदाचा भर आहे. सध्याच्या परिस्थितीत ही जीवनशैली अंगीकारावी, अशी शिफारस केंद्रीय आयुष मंत्रालयाने केली आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने मंत्रालयाने काही आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत. त्यांचा अवलंब केल्यास शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होईल. नागरिकांनी ही जीवनशैली अंगीकारल्यास नक्की उपयोग होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वानुभवावरून सांगितले आहे.