धन्वन्तरी आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, सावंतवाडी

उपलब्ध सुविधा

१) सुवर्ण-प्राशन – ० ते १६ वयोगटातील बालकांना उपयुक्त. यातील सुवर्णभस्म हे सध्याच्या करोनाच्या काळात बालकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अत्यंत उपयोगी. नियमित शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक वाढीसाठी (आकलन-शक्ती, धारणाशक्ती आणि स्मरणशक्ती वाढविण्यासाठी) ब्राह्मी, शंखपुष्पी, गुडूची, वचा (वेखंड), यष्टीमधु, जटामांसी यासारख्या औषधींनी युक्त. दर महिन्याच्या ‘पुष्य’ नक्षत्राच्या दिवशी द्यावे. ‘पाऊच पॅक’ असल्याने कुरियरच्या माध्यमातून घरपोच सेवा.

२) बालकांचे विविध व्याधी – योग्य वाढ न होणे, दमा, फिट येणे, वारंवार सर्दी होणे, पोट बिघडणे, भूक न लागणे इत्यादींसाठी प्रभावी उपचार

३) स्त्रियांचे विकार – मासिक पाळीच्या तक्रारी, पांढरी / लाल धुपणी, ‘अंग’ बाहेर येणे, तारुण्यपीटिका,स्थौल्य, पाळी बंद झाल्यावरच्या तक्रारी, प्रसूतीनंतर बाळंतीण आणि नवजात बालक यांच्या देखभालीसाठी निवासाची सोय (सूतिका परिचर्या)

४) स्त्री आणि पुरुष वंध्यत्व चिकित्सा – आवश्यक ती पंचकर्म चिकित्सा (उत्तरबस्तीसह)

५) स्त्री आणि पुरुष स्थौल्य चिकित्सा / वजन वाढण्यासाठी चिकित्सा – पंचकर्म चिकित्सेसह.

६) न भरणाऱ्या  (विशेषत: मधुमेही रुग्णांच्या) जखमांची चिकित्सा – जखम झालेला भाग कापून न टाकता जखमा भरून येण्यासाठी प्रभावी चिकित्सा. या चिकित्सेने अनेक रुग्णांचे अवयव वाचले आहेत.

७) जुने व चिवट त्वचा-विकार, दमा, सांधेदुखी, पचनाच्या विविध तक्रारी, वृद्धांचे विविध विकार यासाठी उपयुक्त चिकित्सा

८) अग्निकर्म / विद्ध चिकित्सा – सांधे आणि स्नायू यामध्ये होणाऱ्या वेदनांसाठी अत्यंत त्वरित लाभदायक. ‘कुरूप’ किंवा ‘भोवरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विकारांसाठी अग्निकर्म चिकित्सेने हमखास इलाज.

९) गर्भसंस्कार चिकित्सा – नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी अत्यंत लाभदायक. तसेच अव्यंग आणि सुदृढ बालक होण्यासाठी उपयुक्त. यासाठी विवाहपूर्व समुपदेशन आणि शरीरशुद्धी चिकित्सा, उत्तरबस्ती, विवाहोत्तर बीज-शुद्धी चिकित्सा आणि प्रसूती-पश्चात आवश्यक चिकित्सा (भारताची भावी पिढी निकोप व निरोगी बनण्यासाठी).

१०) कोविड-पश्चात चिकित्सा – कोविड या महामारीसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध औषधांचे परिणाम कमी करण्यासाठी तसेच कोविड होऊन गेल्यावर त्याचे विविध उपद्रव कमी करण्यासाठी (उदा. – भूक न लागणे, अशक्तपणा, अंगदुखी, पोटऱ्या वळणे, पचनाच्या तक्रारी इत्यादींसाठी) खास स्नेहन / स्वेदन इत्यादी उपाय.

११) संपूर्ण पंचकर्म चिकित्सा – आरोग्यरक्षणासाठी पंचकर्म चिकित्सेची खास सुविधा तसेच विविध व्याधींनुसार पंचकर्म चिकित्सा

(सावंतवाडीबरोबरच देवगड येथेही या सुविधा उपलब्ध)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply