मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर वृक्षारोपणाचा प्रारंभ

मुंबई-गोवा महामार्गावर तळेकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा प्रारंभ आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

पहिल्या वाढदिवसाला जमले २०० जण; उत्सवमूर्ती होतं कदंबाचं झाड

रत्नागिरी : मुलांचे, मोठ्या माणसांचे किंवा अगदी पाळीव प्राण्यांचेही वाढदिवस उत्सवी पद्धतीने साजरे केले जातात, यात काही नवीन नाही; पण रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावात बुधवारी (१६ जुलै) ग्रामस्थ आणि विद्यार्थी अशा सुमारे दोनशे जणांनी एकत्र येऊन एक अनोखा वाढदिवस उत्साहात साजरा केला. उत्सवमूर्ती होतं कदंबाचं झाड. या एका वेगळ्याच उपक्रमाची सर्वत्र चर्चा आहे.

वृक्षारोपण, वृक्षदिंडी प्रगतिशील शेतकऱ्यांच्या सत्काराने कृषी दिन साजरा

रत्नागिरी : वृक्षारोपण, वृक्षदिंडी प्रगतिशील शेतकऱ्यांच्या सत्काराने करबुडे (ता. रत्नागिरी) येथे आज कृषी दिन साजरा करण्यात आला.