मनोज मेस्त्रींच्या गायनाने काजरेकर कुटुंबाची कोजागरी उत्साहात

जांभवडे (ता. कुडाळ) : येथील पु. वि. काजरेकर यांच्या घरातील वंशपरंपरागत कोजागिरी उत्सव काल रात्री कणकवलीचे गायक मनोज मेस्त्री यांच्या गायनाने अत्यंत उत्साहात साजरा झाला.

कोजागरीच्या घरगुती उत्सवात आर्यादुर्गेला पोह्यांचा नैवेद्य

जांभवडे (ता. कुडाळ) : येथील काजरेकर यांच्या घराण्यात कोजागरीच्या उत्सवाला आर्यादुर्गा आणि लक्ष्मींद्राला विविध प्रकारच्या पोह्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. या उत्सवानिमित्ताने आज कणकवलीतील गायक मनोज मेस्त्री यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.