कोजागरीच्या घरगुती उत्सवात आर्यादुर्गेला पोह्यांचा नैवेद्य

जांभवडे (ता. कुडाळ) : येथील काजरेकर यांच्या घराण्यात कोजागरीच्या उत्सवाला आर्यादुर्गा आणि लक्ष्मींद्राला विविध प्रकारच्या पोह्यांचा नैवेद्य अर्पण केला जातो. या उत्सवानिमित्ताने आज कणकवलीतील गायक मनोज मेस्त्री यांच्या शास्त्रीय, उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

श्री. काजरेकर यांच्या घरात कोजागरीचा वंशपरंपरागत उत्सव आहे. परंपरेनुसार तो आज, आश्विन पौर्णिमेला, ९ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. आजच्या दिवशी काजरेकर यांची कुलदेवता आर्यादुर्गा आणि लक्ष्मींद्र या देवतांची सायंकाळी पूजा केली जाते. नैवेद्याला नारळाचे पाणी आणि पोह्यांचे विविध प्रकार यांचा नैवेद्य दाखवला जातो. हे या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. पूजेनंतर आरत्या, मंत्रजागर होतो. त्यानंतर उपस्थित मंडळींना पोह्यांच्याच प्रसादाचे वाटप होते.
कोजागरीचा जागर म्हणून कीर्तन, भजन किंवा शास्त्रीय संगीत, सुगमसंगीत, नाट्यसंगीत इत्यादी कार्यक्रम केले जातात. यावेळी पाहुणे मंडळी, मित्रपरिवार आणि परिसरातील रसिक उपस्थित राहतात. यावर्षी कणकवलीतील गायक मनोज भालचंद्र मेस्त्री बाग तो आगळा चंद्रम्याचा! हा शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची मैफल रंगविणार आहेत. ते पं. डॉ. समीर दुबळे यांचे शिष्य आहेत. त्यांना संदीप पेंडुरकर (संवादिनी) आणि वेदांत कुयेसकर (तबला) संगीतसाथ करणार आहेत. आज रात्री १० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

कोजागरीच्या कार्यक्रमाला रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन काजरेकर कुटुंबीयांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply