माध्यमांचे स्वरूप बदलले तरी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचे पत्रकारितेचे काम संपलेले नाही. सोशल मीडियावर अशा घटनांना फारसे स्थान मिळत नाही, पण सोशल मीडियाचे काही घटक आपापल्या परीने सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचा प्रयत्न करत असतात. संदेश सप्रे हे त्यापैकी एक पत्रकार होते. त्यांच्या पश्चात जवळच्या कुटुंबीयांना सावरण्याचा विचार सामाजिक संस्था, पत्रकारांच्या संघटनांनी करायला हवा. पत्रकारांसाठी शासन राबवत असलेल्या योजना अत्यंत तुटपुंज्या आहेत. त्यांचा लाभ ग्रामीण पत्रकारांना होण्याची शक्यताच नसते. अशा स्थितीत संदेशसारख्या पत्रकारांसाठी एखादी वेगळी योजना राबवायला शासनालाही भाग पाडायला हवे.