खऱ्या स्त्री-पुरुष समानतेसाठी महिलांना विचारांचे आणि निर्णयाचे स्वातंत्र्य मिळणे गरजेचे : उमा प्रभू

‘महिलांना आकाशात भरारी मारायची असेल, तर पंखांची गरज नाही. शिक्षणातून मिळणाऱ्या तेजाने त्या कुठेही जाऊ शकतात. समाजात स्त्री-पुरुष समानता खऱ्या अर्थाने यायला हवी असेल, तर केवळ प्रतीकात्मकता नको. महिलांना मनाचे, विचारांचे आणि निर्णयाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे,’ असे प्रतिपादन मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा आणि इफ्को-टोकियोच्या संचालिका उमा सुरेश प्रभू यांनी १० मार्च रोजी संध्याकाळी रत्नागिरीत केले. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वूमन्स फेस्ट या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये १० मार्चला वुमेन्स फेस्ट

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे मारुती मंदिर येथील एस. बी. नलावडे कमर्शिअल सेंटर येथील वास्तूत स्थलांतर होणार आहे. यानिमित्त येत्या १० मार्च रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याच वेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वुमेन्स फेस्ट कार्यक्रम होणार आहे.

संकीर्तनातून रसिकांनी घेतला सांगीतिक समाधीचा अनुभव

रागदारीवर आधारित गीतांच्या नृत्यांमधून साकारलेली कला अनुभवताना संकीर्तन या कार्यक्रमात रसिकांनी सांगीतिक समाधीचा अनुभव घेतला. मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात १०७वा चैत्रोत्सव सध्या सुरू आहे. त्या निमित्ताने मंगळवारी (चार एप्रिल) मिरज येथील रौप्यमहोत्सव साजरा करणाऱ्या नृत्यश्री संस्थेने संकीर्तन हा कार्यक्रम सादर केला.

नाव आणि संपन्नता मिळविण्याचे स्वप्न कष्टातून साध्य केले – भरत जाधव

रत्नागिरी : मराठी चित्रपट सृष्टीत नाव कमावण्याचे स्वप्न बाळगण्यापासून ते मराठी कलासृष्टीतील मराठी कलाकाराने सर्वांत महागडी गाडी घेण्यापर्यंतची आपली स्वप्ने अफाट कष्ट करत कशी साकारली, याचा पट नाट्य-चित्रपट अभिनेते भरत जाधव यांनी रत्नागिरीत उलगडला.