रत्नागिरी : कोणे एकेकाळी जगात सर्वोच्च स्थानी असलेल्या भारताला पुन्हा एकदा त्या स्थानापर्यंत पोहोचवायचे असेल तर भारतीय अध्यात्माची, त्यातील भक्तीतून येणाऱ्या शक्तीची वासुदेवानंद सरस्वती यांच्यासारख्या थोर विभूतींची शिकवण पुढच्या पिढीपर्यंत नेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले.