अरुअप्पा जोशी अकादमीच्या दहा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीमध्ये शिकून विविध शासकीय पदांवर नियुक्त झालेल्या १० विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

स्पर्धा परीक्षांसाठी सतत प्रयत्न आवश्यक – रामराजे चांदणे

रत्नागिरी : स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न आवश्यक आहेत, असे मार्गदर्शन रत्नागिरी विशेष कारागृहाचे अधीक्षक रामराजे चांदणे यांनी केले.

आधी चांगला माणूस बना : धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : आधी चांगला माणूस बना. नंतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी व्हा. यात यश मिळवण्यासाठी ध्येय ठरवा, आराखडा बनवा. कठोर परिश्रमाला पर्याय नाही. योग, प्राणायाम करून मनावर ताबा ठेवा आणि विनयशील राहा. यश मिळाले तरी हुरळून जाऊ नका. पुढे काय करायचे हे विसरू नका, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकाद‌मीतर्फे संवादमाला

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे येत्या सोमवारी, दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ‘संवादमाला’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

अरुअप्पा जोशी अकादमीतर्फे सेट/नेट मार्गदर्शन

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीतर्फे फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस नेट सेट परीक्षांसाठी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा अकादमीचे विद्यार्थी पुन्हा चमकले

रत्नागिरी : येथील अरुअप्पा जोशी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण अकादमीचे साईराज पाथरे आणि मानसी लाड हे आणखी दोन विद्यार्थी पोलीस भरतीत निवडून आले आहेत.