मधुमेहींच्या नेत्रविकारांसाठी रत्नागिरीत ५, ६ मार्चला विशेष तपासणी

रत्नागिरी : मधुमेही व्यक्तींना होणाऱ्या डायबेटिक रेटिनोपॅथीसह विविध नेत्रविकारांची तपासणी रत्नागिरीत ५ आणि ६ मार्चला होणार आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे ही विशेष तपासणी केली जाणार असून जिल्ह्यातील मधुमेही नेत्ररुग्णांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरीच्या इन्फिगोमध्ये आज आणि उद्या विशेष नेत्रतपासणी

रत्नागिरी : मुंबईतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या रत्नागिरीतील हॉस्पिटलमध्ये आजपासून (२८ डिसेंबर) येत्या ३१ डिसेंबरपर्यंत विशेष नेत्रतपासणी होणार आहे. या कालावधीत तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असून ते विशेषतः मधुमेही रुग्णांची तपासणी करणार आहेत.