रत्नागिरी : मुंबईतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या रत्नागिरीतील हॉस्पिटलमध्ये आजपासून (२८ डिसेंबर) येत्या ३१ डिसेंबरपर्यंत विशेष नेत्रतपासणी होणार आहे. या कालावधीत तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असून ते विशेषतः मधुमेही रुग्णांची तपासणी करणार आहेत.
मुंबईतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलच्या साखळीतील पंधरावे हॉस्पिटल रत्नागिरीत तीन महिन्यांपूर्वी सुरू झाले. तेथे डोळ्यांशी संबंधित आजारांचे निदान आणि उपचार केले जातात. आजपासून तीन दिवस शंकर नेत्रालय (चेन्नई) येथून प्रशिक्षित प्रसिद्ध डॉक्टर प्रसाद कामत आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेच्या तज्ज्ञ डॉक्टर स्वप्ना गंधे रुग्ण तपासणीसाठी या रुग्णालयात उपलब्ध आहेत.
मधुमेहामुळे डोळ्यांवर होणारे परिणाम, डोळ्यांचा पडदा किंवा रेटिनाच्या व्याधी, डोळ्यांच्या पडद्यावरील डाग, लेझर उपचार, रेटिना डिटॅचमेंट शस्त्रक्रिया, मोतिबिंदू शस्त्रक्रिया अथवा सल्ला आवश्यक असणाऱ्या व्यक्तींनी रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी 9372766504 या क्रमांकावर संपर्क साधावा.

