माधवराव गोखले यांचे निधन

ठाणे : ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे माजी अध्यक्ष तथा भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष साहित्यप्रेमी मा. य. गोखले यांचे आज (सोमवारी) सकाळी साडेअकरा वाजता राहत्या घरी निधन झाले. ठाण्यात झालेल्या ८४ व्या मराठी साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.

गोखले यांच्या निधनाने ठाण्याच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विश्वातील एक अग्रणी व चतुरस्र व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. सरकारी नोकरी सोडून ते बांधकाम व्यवसायात उतरले. सचोटी तसेच चोख व्यवहाराच्या बळावर यशस्वी आणि विश्वासार्ह बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जाऊ लागले. वयाच्या ६०व्या वर्षानंतर एलएलबी आणि एलएलएम होऊन त्यांनी शिक्षणाला वयाचे बंधन नसते, हे दाखवून दिले.

सहकारी बँक कशी चालवावी, याचा मापदंड त्यांनी ठाणे भारत सहकारी बँकेच्या रूपाने निर्माण केला. ती बँक मा. य. गोखले यांची बँक म्हणूनच ओळखली जाते, इतका त्यांचा बँकेवर ठसा होता.

ठाण्याची अपरिमित हानी

ठाण्याच्या सर्वांगीण विकासाशी आपल्या कर्तृत्वाने नाळ जोडलेले मा. य. गोखले यांच्या निधनाने ठाण्याची आणि ठाणेकरांची अपरिमित हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी आणि शिवसेना परिवार सहभागी आहे.

  • एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे जिल्हा
    ………

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Leave a Reply