रत्नागिरी जिल्ह्यात पाच नवे करोनाबाधित, १६ करोनामुक्त, एकाचा मृत्यू

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे ५ करोनाबाधित आढळले, १६ जण करोनामुक्त झाले, तर एकाचा मृत्यू आज नोंदविला गेला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ४ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ११ रुग्ण करोनामुक्त झाले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू नोंदविला गेला.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज आढळलेले पाचही रुग्ण आरटीपीसीआर चाचणीनुसार निष्पन्न झाले. त्यातील तिघे रत्नागिरीतील, तर दोघे खेडमधील आहेत. त्यांच्यासह जिल्ह्यात सध्या १३७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात होम आयसोलेशनमध्ये ६९ जण आहेत, तर सर्वाधिक ३१ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या नऊ हजार १७४ झाली आहे.

जिल्ह्यात आज १६ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ हजार ६७६ झाली असून करोनामुक्तीचा हा दर ९४.५७ झाला टक्के आहे. आज राजापूरमधील एका ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू शासकीय रुग्णालयात झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ३२८ झाली असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.५७ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचे नवे ४ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या पाच हजार ८३९ झाली आहे. सध्या २२२ रुग्ण सक्रिय आहेत. आज ११ रुग्ण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्त झालेल्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या पाच हजार ४५५ झाली आहे. आज सिंधुदुर्गनगरीतील सिद्धार्थनगरातील ७२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १५६ झाली आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply