झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय पहिला – भाग ५

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय पहिला – अर्जुनविषादयोग

राज्या भुलूनीया। पाप करायातें ।
सिद्ध परी का तें । मिळे आम्हां? ।।१७।।

कौरवांच्या हातीं। झाला घात माझा ।
तरी महाराजा । बरें तेंही ।।१८।।

बोलोनी हें पार्थ । सांडी खाली बाण ।
बैसे रथी दीन । होऊनीया।।१९।।

Chapter 1 – Arjuna Regrets

To be a sovereign । Committing a sin ।
Even if we win । Is it real gain? ।।17।।

Even the Kouravas । Reach me great loss ।
Destroy my horse । Better this deal ।।18।।

Expressing this notion ।
Keeping aside the weapon ।
In and out shaken ।
Flops down Parth ।।19।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
प्रथमोऽध्यायः । अर्जुनविषादयोगः

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।
यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥१-४५॥

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥१-४६॥

सञ्जय उवाच ।

एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् ।
विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥१-४७॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादेअर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply