गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीत संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता पारायण; १२५ जणांचा सहभाग

रत्नागिरी : गीता जयंतीनिमित्त रत्नागिरीतील गीता भवनात आज (२२ डिसेंबर) सकाळी चार तास संपूर्ण श्रीमद्भगवद्गीतेचे पारायण करण्यात आले. या पारायणात १२५हून अधिक महिला, पुरुष, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता. गीता मंडळ, नारायणी पठण मंडळ, गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, स्वानंद पठण मंडळ, कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाचे रत्नागिरी उपकेंद्र आणि संस्कृत भारती या सहा संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

राघवयादवीयम् – रामकथा आणि कृष्णकथेची गुंफण असलेला अद्भुत श्लोकसंग्रह

श्रावण महिन्याच्या निमित्ताने संस्कृत साहित्यातील एका अद्भुत श्लोकसंग्रहाचा परिचय आणि मराठी अनुवाद प्रसिद्ध करत आहोत. राघवयादवीयम् हे त्या श्लोकसंग्रहाचे नाव. रामकथा आणि कृष्णकथा एकाच वेळी वाचता येते, हे या राघवयादवीयम् श्लोकसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. कांचीपुरम् येथे सतराव्या शतकात कवी वेंकटाध्वरी यांनी राघवयादवीयम् श्लोकसंग्रहाची रचना केली. या ग्रंथाला अऩुलोम-विलोम काव्य असेही म्हणतात. संपूर्ण संग्रहामध्ये रामासाठी ३० आणि कृष्णासाठी ३० असे केवळ ६० श्लोक आहेत. या श्लोकांमधील पहिली ओळ वाचली, तर रामकथा होते (त्याला अनुलोम म्हणतात.) याच श्लोकाची अक्षरे उलट्या क्रमाने वाचली, तर ती कृष्णकथा होते. याचा मराठी अनुवाद रत्नागिरीतील निवृत्त संस्कृत शिक्षिका सौ. वंदना दिगंबर घैसास यांनी केला आहे.

पुतळा उभारून सुभाषबाबूंसह आझाद हिंद सेनेला अभिवादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज १२५ वी जयंती आहे. त्याचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना केलेले आवाहन

१२ जानेवारी ही स्वामी विवेकानंदांची जयंती. त्यांनी भारतीयांना केलेले आवाहन त्या निमित्ताने प्रसिद्ध करत आहोत.

झोंपाळ्यावरची गीता – शतकापूर्वीची बालसुलभ मराठी रचना

आज (१४ डिसेंबर २०२१) मार्गशीर्ष शुक्ल एकादशी अर्थात मोक्षदा एकादशी आणि गीता जयंती. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी याच दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीता सांगितली आणि ज्ञान देऊन मोक्षाचा मार्ग दाखवला, असं मानलं जातं. त्यामुळेच हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. झोंपाळ्यावरची गीता ही १०० वर्षांपूर्वी कवी अनंततनय यांनी बालसुलभ मराठीत केलेली रचना आहे.

झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय अठरावा – भाग १२

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून (२५ डिसेंबर २०२०) येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध करण्यात आले. आज (चैत्र अमावास्या – ११ मे २०२१) या अनुवादाचा समारोपाचा भाग प्रसिद्ध करत आहोत.
…..