रत्नागिरीतील शेतकऱ्यांना भात, नाचणीच्या सुधारित जातींचे बियाणे मिळणार मोफत; मुदत दोन दिवस

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात (२०२५) भात आणि नाचणीच्या सुधारित जातींचे बियाणे मोफत देण्यात येणार आहे. फक्त त्यासाठी शेतकऱ्यांना ३० मेपर्यंत आपल्या गावातील कृषी सहायक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. जिल्हा नियोजन निधीमधून यासाठीचा खर्च केला जाणार आहे.

पाऊस लवकर आला; पण पेरणीची घाई नको; कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

यंदा रत्नागिरी जिल्ह्यात मे महिन्यामध्ये अभूतपूर्व प्रमाणात पाऊस पडला आहे; मात्र शेतकऱ्यांनी भात आणि नाचणीच्या पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. एरव्ही पेरणी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होते. त्यामुळे पेरणीचा हंगाम गेलेला नसून, यापुढे चार-पाच दिवस पाऊस थांबून ऊन पडल्यावर भातपेरणी करणे सोयीचे ठरेल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पावसाच्या अविश्रांत हजेरीचा सप्ताह; जगबुडी आणि वाशिष्ठीच्या पाणीपातळीत होतेय वाढ

खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीच्या पाणीपातळीने काल (२६ मे) इशारा पातळी ओलांडली होती. आज (२७ मे) सकाळच्या अहवालानुसार पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा कमी झाली आहे; मात्र सकाळपासून दुपारपर्यंतच्या कालावधीत जगबुडी आणि चिपळूणमधील वाशिष्ठी या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

खेड शहरातील मच्छी मार्केटमध्ये भरले पाणी; दापोली-खेड वाहतूक बंद

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. १९ जुलै रोजी सकाळी ११.१५ वाजताच्या स्थितीनुसार, खेड शहरातील जगबुडी नदीने पुराची पातळी ओलांडली असून, खेड शहरात मच्छी मार्केट भागात पुराचे पाणी भरले आहे.

जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; पोलादपूरजवळ दरड कोसळल्याने महामार्ग बंद

रत्नागिरी : गेले चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने आज सायंकाळी (नऊ जुलै) धोक्याची पातळी ओलांडली. आज सकाळपासून सह्याद्रीच्या खोऱ्यात मुसळधार पाऊस झाला असल्याने खेड शहराजवळून वाहणाऱ्या या नदीच्या पुरात वाढ झाली. खेड शहराच्या दुसऱ्या बाजूने वाहणाऱ्या नारिंगी नदीच्या पाण्यातही वाढ झाली असल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलादपूरजवळ दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे.