लोककलांचा महासंघ व्हावा

चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने पहिल्या लोककला महोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. एक विशिष्ट उद्देश ठेवून हा महोत्सव साजरा करण्यात आला. या उद्देशाची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे केवळ सादरीकरणाच्या मर्यादेत न राहता कोकणातील सर्वच लोककलाकारांनी एकत्र येऊन त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. वाचनालयाला पुढाकार घ्यायला लावून असा महासंघ स्थापन करायला हवा.

कोकणी खाद्यसंस्कृतीच्या परिसंवादाने चाळवली श्रोत्यांची भूक

कोकणाच्या खाद्यसंस्कृतीविषयीच्या चिपळुणातील एका परिसंवादाने श्रोत्यांची भूकच चाळवली. कोकणी संस्कृतीतील विविध शाकाहारी, मत्स्याहारी मांसाहारी पदार्थांविषयीची सविस्तर चर्चा या परिसंवादात झाली.

कोकणी लोककलांसाठी महामंडळ स्थापण्याबद्दल सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री शिंदे

‘कोकणात लोककलेची समृद्ध परंपरा आहे. त्यामुळे लोककला महामंडळ स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. कोकणात पर्यटनाच्या अमर्याद संधी आहेत. यासाठीच कोकण विकास प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या माध्यमातून संपूर्ण कोकणाचा कायापालट कालबद्ध रीतीने होऊ शकतो. मुंबई ते सिंधुदुर्गपर्यंत ग्रीनफिल्ड रस्ता तयार झाल्यास पर्यटनवाढीस चालना मिळेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.